Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउध्दव ठाकरेंच्या शपथविधीसाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना निमंत्रण

उध्दव ठाकरेंच्या शपथविधीसाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना निमंत्रण

Good news will given to MLAs on Matoshree by Shiv Sena party chiefमुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीकडून एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली. आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. गुरुवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विविध जिल्ह्यांमधील ४०० शेतकऱ्यांना, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांबरोबरच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच देशभरातून विविध राज्यांचे मुख्यमंत्री पक्षांचे अध्यक्ष सुध्दा हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुध्दा झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments