Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रअवयवदानासाठी विलेपार्ले ते मुंबई सेंट्रलमधील अंतर पार पडले २० मिनिटात

अवयवदानासाठी विलेपार्ले ते मुंबई सेंट्रलमधील अंतर पार पडले २० मिनिटात

मुंबई : आजमितीला अवयवदानाचे महत्व वाढत असून अवयवदान करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. नागपूर ,नाशिक , मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड  येथे अत्याधुनिक हॉस्पिटलची साखळी असणाऱ्या वोक्हार्ट समूहाच्या मुंबई सेंट्रल येथील हॉस्पिटलमध्ये रोजी किडनी व यकृताचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले.

आज मध्य मुंबईत व उपनगरात मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला आहे व त्यामुळे मुंबईतल्या मुंबईत प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. विलेपार्ले येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री एका पेशन्टला ब्रेन डेड घोषित करण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी असेल असा अंदाज बांधला  होता परंतु रविवारी असलेल्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे अनेक मुंबईकर रस्ताने प्रवास करणार अशी कल्पना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या अवयवदान समन्वयक भावना शहा यांना आली असता त्यांनी रविवारी सकाळी मुंबईच्या ट्रॅफीक यंत्रणेंना फोन करून याची कल्पना दिली व त्यांनीही तत्काळ  “ग्रीन कॉरिडॉर” चा पर्याय सुचविला. याविषयी माहिती देताना भावना शहा सांगतात, ” मेट्रोच्या कामामुळे सामान्य वाहतुकीला बराच अडथळा येत आहे व त्यामुळेच आम्ही मुंबईच्या वाहतूक पोलीस विभागाला कळविले व त्यांनी कोणताही विलंब न लावता  ग्रीन कॉरिडॉरला  मान्यता दिली. नानावटी हॉस्पिटलमधून रविवारी ब्रेन डेड रुग्णाच्या जिवंत अवयवाचा प्रवास दुपारी १२ वाजवून ३२ मिनिटांनी सुरु करून मुंबई सेंट्रल येथील  वोक्हार्ट  हॉस्पिटलमध्ये १२ वाजून ५२ मिनिटांनी म्हणजेच २० मिनीटात पूर्ण केला. याच प्रवासाला सर्वसाधारण कमीत कमी दीड  ते दोन तास लागतात.”

मुंबईतील झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या  मार्गदर्शनाखाली नानावटी हॉस्पिटलमधून ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्नाची किडनी मुंबईतील एका ५० वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपण करण्यात आली असून हे रुग्ण गेली ५ वर्षे  डायलासिस वर उपचार घेत होते. तसेच या ‘ब्रेन डेड’  झालेल्या व्यकीचे यकृत हे मुंबईतील ६५ वर्षीय रुग्णास प्रत्यारोपित करण्यात आली असल्याची माहिती मुंबई  सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. पराग रिंदानी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments