पीएमसी बॅंकेने घेतला चौथा बळी!

- Advertisement -

pmc bank crisis death
मुंबई : पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्यानंतर खातेदारांना धक्क्यामागून धक्के लागत आहेत. तीन खातेदाराच्या मृत्यूनंतर आणखी एक खातेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडाली. मुलुंड येथे राहणारे मुरलीधर धारा यांना वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पीएमसी बँकेत त्यांचे खाते असून ते आजारी होते. उपचारासाठी बँकेतून पैसे मिळाले नाही, म्हणून मुरलीधर यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गेल्या आठवड्याभरात पीएमसी बँक खातेदाऱ्यांपैकी चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी मानसिक तणावातून ह्रदयविकाराच्या झटक्यानं संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांना जीव गमवावा लागला आहे. या घटना ताज्या असताना तणावामुळे आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केली होती. आज चौथा बळी गेला असून, ग्राहाकांमध्ये रोष पसरला आहे.

- Advertisement -