Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईचहाचाही भाव वाढणार !

चहाचाही भाव वाढणार !

The price will rise of cutting tea on tapariमुंबई :  देशात महागाईने जोर धरला आहे. दैनंदिन आयुष्यातील महत्वाचे कांदे आणि टोमॅटोच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच आता सर्वांच्या आवडत्या चहाचीदेखील भर पडणार आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रात अंदाजे पाच हजार चहा विक्रेते आहेत. त्यांचाच ‘चहा आणि कॉफी असोशिएशन’ नावाच्या संघटनेने चहा व कॉफीची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

चहा आणि कॉफी असोशिएशनने मुंबई महानगर क्षेत्रात चहाविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चहाची किंमत एक ते दोन रुपयांनी वाढवण्यास सांगितले आहे. असोशिएशनने सांगितले की, दूध, साखर, चहापूड, एलपीजी सिलेंडरच्या किंमती खूप वाढल्या असल्याने चहाची किंमत वाढवणे गरजेचे झाले आहे.

चहा आणि कॉफी असोशिएशनचे कार्य

चार वर्षांपूर्वी चहा आणि कॉफी असोशिएशन (Tea and Coffee Association -TCA) ची निर्मती झाली आहे. टीसीएकडून चहाविक्रेत्यांना व्यवसायाबाबतचे आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. टीसीएने चहाविक्रेत्यांना नव्या किंमती लवकर सुरु करण्यास सांगितले आहे.

सध्याचे चहाचे दर (टपरीवरील)
कटींग चहा – 6 ते 8 रुपये
चहा (फुल) – 10 ते 12 रुपये
स्पेशल चहा (हाफ/कटिंग)- 10 ते 12 रुपये
स्पेशल चहा (फुल)- 15 ते 16 रुपये
कॉफी (हाफ) – 10 ते 12 रुपये
कॉफी (फुल) – 15 ते 18 रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments