Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई महापालिकेतील 'याअकरा' नगरसेवकांना लागले आमदारकीचे डोहाळे

मुंबई महापालिकेतील ‘याअकरा’ नगरसेवकांना लागले आमदारकीचे डोहाळे

'These eleven' corporators in the municipal corporation got the assembly election ticket
राजकारणात एक एक पायरी चढत पुढे जाणे काही चुकीचे नाही. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर आमदार बनण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांवर विद्यमान आणि माजी आमदार निवडणूक लढवत आहेतच, त्यामध्ये आमदारकीच्या इच्छेने शिवसेनाभाजपकाँग्रेससमाजवादी पक्ष आणि मनसे या पक्षांच्या विद्यमान 11 नगरसेवकही मैदानात उतरले आहेत. या सर्व नगरसेवकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहे.

मुंबईमध्ये नऊ नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे तर दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपशिवसेना आणि काँग्रेसच्या सहा माजी नगरसेवकांनीही या निवडणुकीत आपले नशीब आजमावायचं ठरवलं आहे. त्यामध्येही चार माजी नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहेतर दोघा माजी नगरसेवकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अर्जमाघारीची मुदत संपेपर्यंत बंडोबांना थंड करण्याची डोकेदुखी पक्षांसमोर आहे. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

विधानसभेला अधिकृतपणे उतरलेले हे नऊ विद्यमान नगरसेवक

शिवसेना महापौर विश्वनाथ महाडेश्वर – वांद्रे (पूर्व)

रमेश कोरगावकर – भांडुप (पश्चिम)

दिलीप लांडे – चांदिवली

भाजप पराग शहा – घाटकोपर (पूर्व)

काँग्रेस आसिफ झकेरीया – वांद्रे (पश्चिम)

जगदिश अमीन कुट्टी – अंधेरी (पूर्व)

मनसे संजय तुर्डे – कालिना

समाजवादी पक्ष रईस शेख – भिवंडी

अखिल भारतीय सेना गीता गवळी – भायखळा

समाजवादी पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशाने मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे.

शिवसेना विठ्ठल लोकरे – मानखुर्द शिवाजीनगर

यामिनी जाधव – भायखळा

काँग्रेस सुरेश कोपरकर – भांडुप (पश्चिम)

अजंता यादव – कांदिवली (पूर्व)

वडाळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात आक्रमक होत उमेदवारीसाठी अडून बसलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका श्रद्धा जाधव यांची समजूत काढण्यात शिवसेना पक्षप्रमुखांना वेळीच यश आलं. त्यामुळे अर्ज न भरता त्यांनी माघार घेतली.

बंडखोर आजी – माजी नगरसेवक

काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू (मतदारसंघ वडाळा- अँटॉप हिल) – मानखुर्द मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका राजुल पटेल यांचा बंडखोरी करत वर्सोवा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे घटकपक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल (यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवकपद रद्द झाले) यांनी अंधेरी (पूर्व) मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्याविरोधात बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल केला

भाजपचे विद्यमान उमेदवार राम कदम यांच्याविरोधात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी बंड पुकारत घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वरील नगरसेकांपैकी कोणाचे भाग्य उजाळेल हे 24 तारखेला निकालातून समोर येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments