Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई महापालिकेतील 'या' चार नगरसेवकांची विधानसभेवर धडक

मुंबई महापालिकेतील ‘या’ चार नगरसेवकांची विधानसभेवर धडक

BMC Brihanmumbai Municipal Corporation,BMC,Municipalityमुंबई महापालिकेतील ११ नगरसेवक विधानसभेवर धडक मारण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, चार नगरसेवकांनाच मतदरांनी संधी दिली. यामध्ये दोन शिवसेना, एक भाजप, एक समाजवादी पक्ष अशा चार नगरसेवकांच्या गळयात आमदारपदाची माळ पडली.
मुंबईमध्ये ३६ जागांसाठी ११ नगरसेवकांनी आपले भाग्य आजमावण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उडी घेतली होती. चार नगरसेवकांना विजय झाला, तर सात नगरसेवकांचा पराभव झाला. शिवसेनेचे रमेश कोरगावकर, दिलीप लांडे, भाजपचे पराग शहा, ‘सपा’चे रईस शेख विधानसभेवर गेले आहेत. तर सात नगरसेवकांना मतदारांनी नाकारले.
विजयी नगरसेवक..
पराग शहा (भाजप) घाटकोपर पूर्व

रईस शेख (सपा) भिवंडी
दिलीप लांडे (शिवसेना) चांदिवली मतदारसंघ
रमेश कोरगावकर (शिवसेना) भांडूप पश्चिम मतदारसंघ
पराभूत नगरसेवक….
गीता गवळी (अखिल भारतीय सेना)
राजुल पटेल (अपक्ष)
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
जगदीश कुट्टी (काँग्रेस)
आसिफ झकेरिया (काँग्रेस)
संजय तुर्डे (मनसे)
विठ्ठल लोकरे (शिवसेना)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments