Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईथर्टी फर्स्ट : मुंबईत ४० हजार पोलीस, ४ हजार सीसीटीव्ही कॅमे-याची नजर

थर्टी फर्स्ट : मुंबईत ४० हजार पोलीस, ४ हजार सीसीटीव्ही कॅमे-याची नजर

Mumbai Police, Maharashtra Police, 31st celebration, मुंबई : नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी सर्वच मंडळी घराबाहेर पडतात. त्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईसह उपनगरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ४०,००० पोलिस अधिकार आणि कर्मचारी कार्यरत असणार आहेत. CDP, CRPF, होमगार्ड, BDDS अशा स्पेशल फोर्स, ३ ड्रोन ४७०० सीसीटीव्ही कॅमे-यांचा समावेश असणार आहे. अशी माहिती अशी माहिती,  जनसंपर्क अधिकारी प्रणव अशोक, मुंबई ट्रॅफिक शाखेचे आयुक्त सोमनाथ गारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेट वे ऑफ इंडिया , मरीन ड्राइव्ह, चौपाटी, जुहू , मड, पवई अशा गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलिस बदोबस्त असेल. अशा ठिकाणी महिला सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये साध्या वेशातील पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बॉम विरोधी पथक ही ठराविक ठिकाणी आहेत.

हे रस्ते बंद ठेवण्यात येणार…

जुहु,मारिन ड्राइव्ह, वरळी -सीपेस, माऊंट मेरी-बांद्रा, छत्रपती शिवाजी रोड-गेटवे, इत्यादी महत्वाचे ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी नो पर्किन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १०० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह, रश ड्रायव्हिंग वर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

यंदाही कडक कारवाई होणार….

३१ डिसेंबर २०१८ रोजी ४३३ लोकांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि रश ड्रायव्हिंग ची कारवाई करण्यात आली होती. ह्या वेळी कडक कारवाई मुळे हा आकडा वढण्याची शक्यता आहे.अशी माहिती मुंबई ट्रॅफिक शाखेचे आयुक्त सोमनाथ गारगे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments