Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रयंदाचा मान्सून वेळेआधीच, लवकरच उकाड्यापासून दिलासा

यंदाचा मान्सून वेळेआधीच, लवकरच उकाड्यापासून दिलासा

मुंबई : ऊन्हाळ्यामध्ये प्रत्येक माणूस ऊन्हाच्या तडाख्याने त्रासलेला असतो. कधी एकदा पाऊस येईल याची आतुरतेने वाट पाहत असतो. आता वाट पाहायची वेळ गेली आहे कारण यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय. केरमध्ये मान्सून साधारणतः १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहचेल अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. 

२० मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर पोहचेल. यानंतर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरु होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केलाय. तर मान्सून १० ते १५ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहचेल असा अंदाजही स्कायमेटनं वर्तवलाय.याआधी मान्सून १०० टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज ४ एप्रिलला व्यक्त केला होता.

दरम्यान, यंदाचा मान्सून वेळे आधी आला तर, त्याचे स्वागतच केले जाईल. कारण, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. तसेच, काही जिल्ह्यांमध्ये तर, थेट उष्णतेच्या लाटेचाच इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments