Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दरबारी!

सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दरबारी!

Devendra fadnavis bjp shivsenaमुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्ली दरबारी जाणार आहेत. त्यामुळे दिल्लीत काय फैसला होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेचा निकाल लागून अकरा दिवस लोटले आहेत तरी सुध्दा शिवसेना आणि भाजपामधील सत्तासंघर्षावरून पेच कायम आहे. शिवसेना सत्तेच्या समसमान वाटपावरून आक्रमक आहे त्यामुळे भाजपाची कोंडी झालेली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट दिल्ली दरबारी बोलवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज रविवारी अकोला जिल्हा दौरा केला. या दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी काळजीवाहू सरकार चालवताना मर्यादा येत आहेत. तसेच लवकरच सत्ता स्थापन झाली पाहिजे असे सांगितले होते. त्यामुळे या सर्व घटना बघता पुढच्या घडामोडींना वेग आला आहे.

सोमवारी दिल्लीत काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र सध्यातरी शिवसेना त्यांच्याभूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर बरचं काही अवलंबून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments