Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली; दुपारपर्यंत निरुत्साह!

मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली; दुपारपर्यंत निरुत्साह!

Voter, Voting, Vote, Assembly Elections,Elections,Maharashtra Assembly Elections,Maharashtra Assembly Polls
Image Courtesy: Bloomberg

मुंबई: आज विधानसभेसाठी महाराष्ट्रात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र दुपारपर्यंत महाराष्ट्रात दिड वाजेपर्यंत 24 टक्के मतदान झाले आहे. यामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.

मुंबई शहरात आतापर्यंत 18 टक्के, उपगरात 20 टक्के मतदान झालं. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात निरूत्साह दिसून येत आहे. राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार असून, 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. परंतु आज मतदानाचा दिवस असूनही, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. सकाळपासून कुठे ढगाळ तर कुठे उन आहे. त्यामुळेही मतदार घराबाहेर पडले नाही. सेलेब्रेटींनी, उमेदवारांनी मतदान करण्याचे आवाहन केले तरी सुध्दा मतदार अद्यापही बाहेर पडले नाही.
निवडणूक आयोगाने, शासनाने जाहीरातीच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन केले होते. परंतु सध्यातरी मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येत आहे. तरी मतदारांनी मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडावे व लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे, आवाहन करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments