Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसायन आज मतदान: शिवसेनेविरोधात काँग्रेसची शिवसैनिकाला उमेदवारीने चुरस!

सायन आज मतदान: शिवसेनेविरोधात काँग्रेसची शिवसैनिकाला उमेदवारीने चुरस!

Congress, Shiv Sena, sion

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक १७३ चे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. या प्रभागात आज शुक्रवारी एप्रिल रोजी मतदान होत असून शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

सायन प्रभाग क्रमांक १७३ मधून शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र काही कालावधीत त्यांचे निधन झालं. रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने रामदास कांबळे आणि संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक ठोंबरे यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे शिवसेनेची मतं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण शिवसेनेने ठोंबरे यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं.
ठोंबरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी, ठोंबरे यांना मानणारे शिवसैनिक कमालीचे नाराज आहेत. त्यात काँग्रेसने शिवसैनिक असलेल्या सुनील शेट्ये यांना उमेदवारी देऊन, शिवसेनेची मतं कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रभाग २१ मधील भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक १७३ मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने या प्रभागात आपला उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे, काँग्रेसचे सुनील शेट्ये आणि अपक्ष असलेले गौतम झेंडे आपले नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी २४ मतदान केंद्रावर ३२ हजार ८५१ मतदार मतदान करणार आहेत. यात १७ हजार ५६६ पुरुष आणि १५ हजार १९४ महिला मतदार आहेत. शनिवारी ७ एप्रिलला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments