Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत! - अजित पवार

आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत! – अजित पवार

मुंबई – महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचं वेगळं लक्ष असतं. या निवडणुकांना सामोरं जात असताना लोकांच्या मनात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत! अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

ईव्हीएम विरोधात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी ईव्हीएमबाबत पक्षाच्यावतीने मत मांडले.मागच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा अशाप्रकारची मागणी केली होती. अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, ही कुण्या एका राजकीय पक्षाची नव्हे! संपूर्ण जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

देशात अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.भाजपने जो अंदाज व्यक्त केला तसा निकाल लागला. अनेकांनी याबाबत ईव्हीएम मशीनवर निवडणूक होऊ नये अशी भूमिका व्यक्त केली परंतु हे अमान्य करण्यात आले असेही अजितदादा पवार म्हणाले.आता या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे यासाठी सगळेच पक्ष एकत्र आले आहेत असेही अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

देशात पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे. अशा व्यवस्थेवर सगळयांना शंका आहेत. त्यात हे लोक अंदाज व्यक्त करतात आणि तितक्या जागा येतात हे अजब आहे असे आश्चर्य व्यक्त केले.आता देशात संभ्रमाचे वातावण निर्माण झाले आहेत. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे यासाठी अजितदादा पवार यांनी जनतेला आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले.

अनेकांनी ईव्हीएम मशीनवर होणाऱ्या निवडणूकांवर अविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी हा लढा सुरू केला आहे. या लढ्यात सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले आहे तरीदेखील आपल्याला हे का हवे आहे?असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.निवडणुकीवर सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे यासाठी सरकारला गदगदा हलवण्याची गरज आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments