Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईरासप पक्षा कडून दौंडची जागा अभिनेता संजय दत्त लढवणार?

रासप पक्षा कडून दौंडची जागा अभिनेता संजय दत्त लढवणार?

मुंबई: अभिनेता संजय दत्त येत्या २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात(रासप) मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. संजय दत्त यांचा आजच पक्षात प्रवेश होणार होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नसल्याचं जानकर यांनी सांगितलं. त्यामुळे संजूबाबा रासपमध्ये जाणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जानकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

विधानसभेसाठी१४ जागा हव्यात

लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. तरीही आम्ही युतीसोबत राहिलो. मात्र आता विधानसभेसाठी आम्हाला १४ जागा हव्या आहेत. या १४ जागा मिळाल्या तरच आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये रासपला राजकीय पक्ष म्हणून मान्यता असल्याचं सांगतानाच रासपला दौंडची जागा सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. रासप भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवू, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आमची मागणी पूर्ण करावी, असा आग्रहही त्यांनी धरला. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भाजप सरकारच घेईल. त्यामुळे आम्ही भाजपला साथ देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments