Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकुलाब्यात लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

कुलाब्यात लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

kolaba lift navy nagar
image: NBT

मुंबई : लिफ्टमध्ये अडकल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये घडली. आरती दशरथ परदेशी असे या महिलेचे नाव आहे.

कुलाबा येथील नौदल अधिकारी निवासी वसाहतीतील विजया अपार्टमेंट या इमारतीमध्ये एका अधिकाऱ्याकडे आरती दशरथ परदेशी मालकाच्या श्वानाला घेऊन बाहेर फिरण्यास निघाल्या. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट येताच प्रथम श्वान आतमध्ये गेले. आरती आत जाणार त्याचवेळी त्यांचा पाय लिफ्ट आणि भिंत यांच्यामधील मोकळ्या जागेत अडकला. हा मोकळा भाग इतका मोठा होता की त्यात आरती यांचे निम्मे शरीरही अडकले होते.

त्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होत्या. जवळपास अर्धातास त्यामध्ये गेला. नंतर त्या बेशुद्ध पडल्या. लिफ्ट बराच वेळ एकाच मजल्यावर असल्याने काही रहिवाशी पाहायला आले असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने आरती यांना लिफ्टमधून बाहेर काढले आणि अश्विनी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी आरती यांना मृत घोषित केले. पुढील तपास कफ परेड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments