“महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा करोनाने डोके वर काढले!”

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची महाविकासआघाडी सरकारवर टीका

- Advertisement -

मुंबई: राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.करोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले..राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी! महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा करोनाने डोकेवर काढले! असं शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वा

- Advertisement -

ची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here