Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमाझा पुरस्कार हा पूरग्रस्ताना समर्पित करतो - गायक नंदेश उमप

माझा पुरस्कार हा पूरग्रस्ताना समर्पित करतो – गायक नंदेश उमप

प्रतिनिधी- एखादा पुरस्कार स्विकारणे म्हणजे मोठी जबाबदारी असते. मला मिळालेला कार्यसिध्दी पुरस्कार हा राज्यात आलेल्या पुराने त्रस्त झालेल्या सर्व पूरग्रस्ताना मी समर्पित करीत आहे अशा शब्दात गायक, संगीतकार नंदेश उमप यानी त्याना मिळालेल्या कार्यसिध्दी पुरस्काराबद्दल उदगार काढले. अस्मी स्टुडीओ व ८के मल्टिमिडीया यांच्यातर्फे आयोजित रंग मल्हार कार्यक्रमाच्या वेळी नंदेश उमप याना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खासदार राजन विचारे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ठाण्यातील सहयोग मंदिरमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे, टिप ट़ॉप ह़ॉलचे रोहीतभाई, अस्मी स्टुडीओच्या रूपाली तेलवणे, संदीप तेलवणे आदी उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना उमेश उमप म्हणाले की, आपल्याला आपल्या कार्याबद्दल मिळालेला पुरस्कार हा नवीन उभारी देणारा असतो त्याबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. सूरांच्या सागरात मी वडिलांमुळे पोहायला शिकलो या सागरात एकदा शिरलो की, नवीन सूर गवसतात.

पावसाच्या साक्षीने आयोजित रंग मल्हार कार्यक्रमात बासरी वादक विवेक सोनार यांनी मल्हार रागाबरोबर विविध राग बासरीवर वाजवून रसिकांची दाद मिळवली. त्याना तबलावर साथ अनुतोष दिघारीया यानी दिली. दुसरया सत्रात पंडीत राम देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने राग मल्हारच्या संगीतात रसिक न्हावून गेले. त्याना तबलावर साथ यती भागवत व हार्मोनियमवर अनंत जोशी यानी साथ दिली. श्रेयसी मंत्रवादी यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकानी भरभरून प्रतिसाद दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments