Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भनागपूरनागपूर भाजपा युवा मोर्चोच्या उपाध्यक्षाची हत्या!

नागपूर भाजपा युवा मोर्चोच्या उपाध्यक्षाची हत्या!

महत्वाचे…
१.गेल्या दीड महिन्यातील व्यापाऱ्याचे अपहरण आणि हत्येचे हे तिसरे प्रकरण २. खून झालेले व्यापारी डहरवाल हे भाजपा युवा मोर्चाचा माजी उपाध्यक्ष ३.कायदा सुवव्यस्थेची ऐशी तैशी


नागपूर : नागपूरच्या अतूल डहरवाल या तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली. गेल्या दीड महिन्यातील नागपूर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ इतवारी मधील व्यापाऱ्याच्या अपहरणाची आणि हत्येची ही तिसरी घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्ग पुरता हादरून गेलाय. खून झालेले व्यापारी डहरवाल हे भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष होते.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील लोधीखेडा येथील जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या मृतदेहावरील कपड्यांच्या खिशातील चिठ्ठूीवरून हा मृतदेह नागपूरच्या नंदनवन परिसरात हॉटेल चालवणाऱ्या अतूल डहरवाल यांचा असल्याची ओळख पटवली. पण अतूलची कार नागपूरच्या घरीच असल्याने तो मध्यप्रदेशात कसा पोहचला आणि त्याची हत्या केव्हा झाली या प्रश्नांची उत्तरे डहरवाल कुटुंबियांना सापडत नाही.

अतुलला व्यापारातील काही पैसे शिव नावाच्या व्यक्तीकडून घ्यायचे होते त्यामुळे या शिव नावाच्या व्यक्तीने त्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपी शिव सध्या मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे पण गेल्या दीड महिन्यातील व्यापाऱ्याचे अपहरण आणि हत्येचे हे तिसरे प्रकरण असल्याने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी अतुलच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे हादरलेल्या गांधीबाग आणि इतवारीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. डिसेंबर मध्ये लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रे आणि राजू नारंग यांचेही असेच अपहरण करून खून केल्यानंतर मृतदेह फेकून देण्याची घटना घडली होती. या प्रकरणातही आरोपींच्या मनात कायद्याची भीती उरली नसल्याचं दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments