Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeविदर्भनागपूरमुस्लीम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलीचं कन्यादान!

मुस्लीम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलीचं कन्यादान!

nagpur, muslim father, hindu daughterनागपूर : मुलगी हिंदु आणि पिता मुस्लिम असं ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्का निश्चित बसणार. होय हे सत्य आहे. कारण वधु सुषमा चाचेरे आणि वधुचे पिता अहफाज अहमद वेगवेगळ्या धर्माचे. पण बाप-लेकीचं हे अनोखं नातं नागपूर जिल्ह्यातील कामठीत चर्चेचा विषय बनला आहे. कारण आपल्या मानलेल्या मुलीच्या कन्यादानासाठी या बापाने धर्माच्या भिंती सहज ओलांडल्या आणि हिंदू रितीरिवाजांनुसार सुषमाचं लग्न थाटामाटात लावून दिलं. अहफाज अहमद हे नागपूरमधील कामठी नगरपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत.

१८ वर्षापूर्वी अहफाज अहमद यांची ११ वर्षीय मुलगी ब्रेन ट्युमरने दगावली. आठवणी पाठ सोडत नव्हत्या म्हणून अहफाज नव्या ठिकाणी स्थायिक झाले. शेजारच्याच चाचेरे कुटुंबातली लहानगी सुषमा त्यांनी आपल्या कुशीत घेतली. जेवढे सुषमाला आई-वडील प्रिय त्याहून जास्त माया ती अम्मी-अब्बूवर. तिच्या अम्मी अब्बूंनीही तिला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. वयात आल्यावर घरी लग्नाची चर्चा सुरू झाली. माझं एका मुलावर प्रेम आहे असं मी घरी सांगितलं. यानंतर माझ्या लग्नाची पूर्ण जबाबदारी अब्बूंनी घेतली, असं सुषमाने सांगितलं. अहमद यांनी वडील म्हणून कर्तव्य बजावत सुषमाचे हिंदू धर्मात संपूर्ण विधीवत लग्नच लावलं नाही तर तिचं कन्यादानही केलं.
थाटामाटात लग्न पडले. विशेष म्हणजे या लग्नाला नातेवाईकांनी स्वीकारलं आणि पाठिंबाही दिला. पण आता आईवडिलांइतकिच तिची कमतरता अब्बू अम्मीलाही जाणवत आहे. मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल आणि हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल गैरसमजच जास्त आहेत. एकमेकांना समजून न घेता, एकमेकांच्या सोबतीचा अनुभव न घेता हे गैरसमज प्रबळ झाल्याचं सुषमा सांगते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments