Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भनागपूरसोमवार पासून नागपूरचे अधिवेशन ऐन थंडीत तापणार!

सोमवार पासून नागपूरचे अधिवेशन ऐन थंडीत तापणार!

महत्वाचे…
१.पाच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती २. जनतेतील असंतोषामुळे ९० हून अधिक मोर्चे नागपूर अधिवेशनावर धडकणार ३. काँग्रेस-राष्ट्रवादीने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये धडकणाऱ्या मोर्चाने होणार


नागपूर   सरकारी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा लटकलेला प्रश्न आणि विरोधकांकडून सरकारविरोधात सुरू असलेले जनआक्रोश हल्लाबोल आंदोलन या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण मात्र ऐन थंडीत तापणार आहे.

जनतेतील असंतोषामुळे ९० हून अधिक मोर्चे नागपूर अधिवेशनावर धडकणार असून यासाठी पोलीस तसेच एसआरपीचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. विधान भवन रस्त्यावरून वेगवेगळ्या दिशेने वळवलेली वाहतूक, नाक्यानाक्यावरील पोलीस बंदोबस्त यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली आहे. विधान भवनावर यंदा निघणाऱ्या मोर्चांची संख्या ९० च्या घरात असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ५३ जणांनी अर्ज सादर केले असून ४० संघटनांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे तसेच पोलिसांनाही व्हिडीओ कॅमेरे पुरविण्यात आले असून या माध्यमातून अधिवेशनावर येणारे मोर्चे तसेच गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. विधान भवन, राजभवन, रविभवन, आमदार निवास, नागभवन, व्हीआयपींच्या वास्तव्याची ठिकाणे यासह पाच मोर्चे पॉइंट क पटवर्धन मैदान येथे पोलीस दल नियुक्त करण्यात येणार आहे.

२ हजार ७३० अधिकारी व कर्मचारी बाहेरून मागविण्यात आले आहेत. त्यात एसआरपीच्या आठ तुकड्य़ा, फोर्स वनचे एक युनिट, क्युआरटीचे ४ व बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या २० पथकांचा समावेश आहे. १५ अधीक्षक दर्जाचे आणि ४३० अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. याशिवाय होमगार्डसह शहरातील सुमारे २ हजार २०० कर्मचारीही सुरक्षा व्यवस्थेत राहतील.

विरोधकांचा मोर्चा; चहापानावर बहिष्कार टाकणार
काँग्रेस-राष्ट्रवादीने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता १२ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये धडकणाऱ्या मोर्चाने होणार आहे. या मोर्चाला स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संबोधणार आहेत, तर काँग्रेसकडून गुलाब नबी आझाद यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. साडेतीन लाखांहून अधिक गर्दी या मोर्चात होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments