Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रनाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी Maharashtra Congress President नाना पटोले Nana Patole यांची वर्णी लागली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले  यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे.

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अध्यक्ष कोण?
1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)
काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?
1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (जालना)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ आल्याचे बोलले जात होते.

नाना पटोले यांचा राजीनामा
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला होता. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केल्यानंतर पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments