Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदी- उध्दव ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार

नरेंद्र मोदी- उध्दव ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार

Narendra Modi uddhav thackeray will address mumbai bkc
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर सायंकाळी 6 सभा होणार आहे.

शिवसेना- भाजपा महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी असली तरी दोन्ही पक्ष महायुती भक्कम असल्याचे सांगत आहेत. मात्र, चित्र वेगळेच आहे. विधानसभा निवडणुकीत जागावाटपात भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागांवर लढत आहे. विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत मोठा भाऊ असणारी शिवसेना आता धाकटय़ा भावाच्या भूमिकेत आली.

महायुतीच्या नेत्यांनी २२० जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या सभा दणक्यात सुरु आहे. निवडणूक प्रचार काळात एकत्र न फिरता स्वतंत्रपणे फिरून जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचण्याची रणनीती ठरवण्यात आली. भाजपचे नेतेही वेगवेगळे फिरून अधिकाधिक मतदारसंघात पोहोचत आहेत. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्याआधी शिरस्त्याप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांची मुंबईत सभा होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहतील. महायुतीचे अनेक बंडखोर एकमेकांविरोधात उभे आहेत. या पाश्र्वभूमीवर युतीच्या सर्वोच्च नेत्यांच्या या पहिल्या व शेवटच्या संयुक्त प्रचार सभेत काय संदेश देतात याबाबत उत्सुकता आहे. मात्र, मतदार किती प्रमाणात महायुतीला कौल देतील हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments