Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदी आल्यापासून टेलीव्हिजनवरचे कॉमेडियन झाले गायब'- कन्हैया कुमार

नरेंद्र मोदी आल्यापासून टेलीव्हिजनवरचे कॉमेडियन झाले गायब’- कन्हैया कुमार

अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे कॉमेडियन असून, नरेंद्र मोदी आल्यापासून टेलीव्हिजनवरचे कॉमेडियन गायब झाले असल्याची टीका कन्हैया कुमार यानी केली आहे. कन्हैया कुमार आज संगमनेर येथे कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमासाठी आला होता.

सध्या देशापुढील प्रश्न कोणते आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. सध्या गायीचही आधारकार्ड बनवण्याची तयारी सरकार करत असताना राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीवर मात्र नियंत्रण नसल्याचे म्हणटले आहे. नोटबंदीनंतर छापलेले नोट परत जमा झाले मग काळेधन गेले कुठे ? नोटबंदीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दोषींवर गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल कन्हैया कुमार याने उपस्थित केला आहे.
जीएसटी सारखा कायदा चांगला आहे. मात्र सरकारने काही वस्तूवर लावलेला टॅक्स चुकीचा असून, जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडून देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. पुनढे बोलताना कन्हैया म्हणाला, की भाजपाने निवडणुकीच्या वेळी अनेक घोषणा केली. ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या भाजपाने सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना मात्र पक्षात सामील करून घेतले. भाजपात राहून भ्रष्टाचार केला तर तो राष्ट्रहीत आणी इतरांनी केला तर भ्रष्टाचार असे झाले आहे. जनतेने भाजपाची अपेक्षा काय आहे हे जर लवकर लक्षात घेतले नाही, तर राम राम करता करता नथुरामचे मंदिर प्रत्येक घरात निर्माण होईल असेही कन्हैया कुमार यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments