होम महाराष्ट्र उत्तर महाराष्‍ट्र भाजपमधील ‘हिरे’ राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भाजपमधील ‘हिरे’ राष्ट्रवादीच्या वाटेवर?

51
0
शेयर

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख राजकीय कुटुंबीयांपैकी एक असलेल्या हिरे कुटुंबीयांनी बंडाचे सूतोवाच दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत भाजप आमदार अपूर्व हिरे यांनी दिलेत.

हिरे कुटुंबीय काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. आगामी निवडणुकीची रुपरेषा  ठरविण्यासाठी माजी मंत्री प्रशांत हिरे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये हिरे समर्थकांची सभा आयोजित केली होती. यावेळी हिरे कुटुंबीयांची नाराजी लपून राहिली नाही. या नाराजीनंतर हिरे कुटुंबिय राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे.

पक्षाच्या जिल्हा पदाधिका-यांनी दुकानदारी सुरु केलीय. आगामी काळात अशीच अवस्था राहिल्यास पक्षात काम करणे शक्य नाही असं भाजप आमदार अपूर्व हिरे यांनी म्हटलंय. आमदार हिरे यांनी पक्ष सोडल्यास नाना पटोलेंनंतर पक्ष सोडणारे राज्यातील ते दुसरे लोकप्रतिनिधी ठरतील.