Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही : बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही : बाळासाहेब थोरात

ncp congress Merge
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसध्ये विलीनीकरण होणार आहेत असे वक्तव्य केलं होतं. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विलिनीकरणा बाबत नकार दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार आणि तत्त्व एकच आहेत. आम्ही आघाडी म्हणूनच काम करीत आहोत. असेही थोरात म्हणाले.

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केलं होतं. याबाबत थोरात यांनी संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. संगमनेरमध्ये थोरात यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. थोरात म्हणाले, ‘१९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर दोन्ही पक्ष आघाडीत काम करीत आहेत. आमचे विचार एकच आहेत. सध्या तरी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय कोठेच आलेला नाही. मात्र, काळाच्या ओघात काय होईल सांगता येत नाही. तरीही त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही.’ असेही थोरात म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments