अजित पवारांचा आमदारपदाचा तडकाफडकी राजीनामा

- Advertisement -

ncp leader ajit pawar resigns MLA post

शिखर बँक घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवारांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हा सस्पेंन्स सध्या तरी कायम आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे विधान परिषद अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

- Advertisement -

अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. मात्र कुणीही अजित पवार  यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here