Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले भिडे गुरुजींबद्दल

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले भिडे गुरुजींबद्दल

मुंबई: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे ज्या वेळी काही विधान किंवा दावा करतात त्यावेळी त्याची जोरदार चर्चा रंगू लागले. सोशल मीडियामध्ये तर त्यांचे सर्व वक्तव्य चर्चेचा विषय होऊन जातो. अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य भिडे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही या वक्तव्यावरुन भिडे गुरुजी यांची फिरकी घेतली.

 भिडे गुरुजींनी काय केला होता दावा

पुण्यामधील एका कार्यक्रमादरम्यान चांद्रयान मोहीमेबाबत भिडे गुरुजींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अमेरिकेची चांद्रयान मोहिम आणि एकादशीचा संबंध सांगणारे वक्तव्य केले. “भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग केला म्हणूनच अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. अमेरिकेने आत्तापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. तेव्हा नासाच्या एका वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह एकादशीच्या दिवशी सोडला. ज्यामुळे अमेरिकेची मोहीम यशस्वी झाली. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातली स्थिती संतुलित असते. त्याचमुळे प्रयोग यशस्वी झाला” असंही संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘मी निश्चय केला आहे.  परमपूज्य भिडे गुरुजींबद्दल काहीच भावना व्यक्त करणार नाही. त्यांची वक्तव्ये महाराष्ट्रातील लोकांना आवडतात.’ यानंतर त्यांनी दोन ट्विटमध्ये भिडे गुरुजींनी केलेली आठ वक्तव्यांची यादीच पोस्ट केली आहे.

आव्हाड यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या वक्तव्याची यादी पुढीलप्रमाणे –

१) नेहरू मूर्ख होते.

२) गांधीवाद हा देशाला लागलेला रोग आहे.

३) जास्त शिकलेला माणूस हा सुपर गां* असतो.

४) मनू हा संतांपेक्षा श्रेष्ठ होता.

५) संभाजी महाराजांना अक्कल नव्हती.

६) सगळ्या म्लेंच्छाना मारून टाका

७) अमेरीकेने एकादशीला यान सोडले म्हणून ते यशस्वी झाले.

८) माझ्या बागेतील आंबा खाऊन मुलगा होतो.

या ट्विटच्या शेवटी आव्हाड यांनी ‘ही सगळी वक्तव्य विज्ञानवादी महाराष्ट्रात झाली. मी निःशब्द आहे,’ असा टोला लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments