Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादराष्ट्रवादीचे जयदत्तअण्णा क्षिरसागर भाजपाच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचे जयदत्तअण्णा क्षिरसागर भाजपाच्या वाटेवर?

बीड- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या मागील काही महिन्यापासून उत आहेत. याला आज एक प्रकारे दुजोरा मिळत असूनराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेजलसंपदामंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या निवासस्थानी भेटीला गेले होते. जयदत्त क्षिरसागर हे गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (शुक्रवारी) बीडच्या दौ-यावर पोहचले आहेत. या दौऱ्यादरम्यान जयदत्त क्षिरसागरांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या बंगल्यावर नाष्ट्यासाठी खास आमंत्रण दिले. मुख्यमंत्रीही त्यांच्या आमंत्रणामुळे क्षिरसागरांच्या बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री पंकजा मुंडे व गिरीश महाजन यांच्यासमवेत त्यांच्या बीडमधील बंगल्यावर गेले. या वेळी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांसाठी खास व्यवस्था केली होती. त्यानंतर क्षिरसागर यांनी मुख्यमंत्री, पंकजा मुंडे व गिरीश महाजन यांच्यासोबत हेलिकॉप्टरने हवाई सफरही केली. या सगळ्या घडामोडींमुळे क्षिरसागर हे भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झाले आहे.

बीडच्या राजकारणात पवारांनी धनजंय मुंडे यांना नको तितके महत्त्व दिल्याने बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षात नाराज आहेत. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना वैतागून यापूर्वीच भाजपला जवळ गेले आहे. आता जयदत्त क्षिरसागर यांच्यासारखा ओबीसी वर्गातील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत.

धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षिरसागर यांना शह देत त्यांचे पुतणे संदीप क्षिरसागर यांना ताकद देत पुढे आणल्याने जयदत्त नाराज असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments