राष्ट्रवादीचे नेते वसंतराव डावखरे यांची प्रकृती गंभीर

- Advertisement -

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणाली (व्हेंटीलेटर) वर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली असून डावखरे यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुत्रपिंडाच्या विकाराने ते ग्रस्त असून त्यांच्यावर अलिकडेच ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्गाचा त्रास झाल्यामुळे गेली अनेक दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. घरीही त्यांच्यावर उपचार सुरुच होते. बुधवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. गुरुवारी श्वसनाचाही त्रास झाल्याने त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -