Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्रालयात सर्व व्हिजीटर्सना नो एन्ट्री!

मंत्रालयात सर्व व्हिजीटर्सना नो एन्ट्री!

मुंबई : कोरोनाच्या कहरमुळे विविध कामानिमित्त मंत्रालयात येणा-या व्हिजीटर्सना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी दिली.

मंत्रालयातून राज्यातून विविध भागातून कामानिमित्त मंत्रालयात येणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयुक्तांकडे करणार आहोत. राज्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना कुलगुरुंना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याच्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून ग्रामपंचायतीच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याचीही माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

  • पुणे – १६
  • नागपूर – ४
  • यवतमाळ – ४
  • ठाणे – १
  • अहमदनगर – १
  • कल्याण ३
  • पनवेल – १
  • नवी मुंबई – १
  • मुंबई – ८
  • नवी मुंबई- १
  • औरंगाबाद – १
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments