Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरअण्णा हजारे धावले, शरद पवारांच्या मदतीला!

अण्णा हजारे धावले, शरद पवारांच्या मदतीला!

Anna Hazare Sharad Pawar ED Money Laundering,Anna Hazare,Sharad Pawar,Money Laundering Case,ED, Enforcement Directorate,MSC Bankअहमदनगर: राज्य सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. सर्वत्र त्याचा निषेध केला जात आहे. मात्र, या घोटाळ्याचे पुरावे सादर करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पवारांच्या मदतीला धावून आले. पवारांचे नाव या पुराव्यांमध्ये नाही असे अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पवारांचे नाव कसे आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

अण्णा हजारे म्हणाले, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नव्हते तरीही त्यांचे नाव यामध्ये कसे आले हे आपल्याला माहिती नाही. पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आले असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

अण्णा हजारे यांनी सांगितले की, जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अकडवण्यात येऊ नये. उलट माझ्याकडील पुरावे चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करुनही त्यांनी याप्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही यावेळी हजारे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments