Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरमैत्री जपणारी माणसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतचं – आदित्य ठाकरे

मैत्री जपणारी माणसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतचं – आदित्य ठाकरे

अहमदनगर :  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी जरी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्री जपणारी माणसं आहेत. महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संबोधित केले. या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते.

नवा महाराष्ट्र घडवायचा विधानभवनात खूप काही शिकण्याची संधी आहे. माझ्या आजोबांनी नेहमी सांगितलंय आणि वडिलही सांगत असतात. कुठलाही प्रोटोकॉल लागू झाला तरी स्वत:चं जगणं आणि राहणीमान बदलू नकोस. मी प्रत्येक माणसाला सांगतो. मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त तरुण आमदार आहेत. आम्ही तरुण आमदार एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी इच्छितो. ज्या ज्या मिनिटाला जे गरजेचं असतं, ते केलं पाहिजे. टेन्शन बाजूला सोडून मजा करणं गरजेचं आहे. मी अनेक फेस्टिव्हल पाहिले, पण थोडं वेगळं आहे. युवा पिढी मनातले प्रश्न विचारायला लागली आहे.

अजित पवार आवडतात की देवेंद्र फडणवीस या प्रश्नाल उत्तर देतांना आदित्य ठाकरे यांनी अजित पवार मला आवडतातं असं उत्तर दिलं. तर आई बाबांमध्ये दोन्ही आवडतात परंतु कोणता प्रश्न कोणाकडे सुटेल ती परिस्थिती बघून मी त्यांच्याकडे जातो असं आदित्य ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments