Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरशिवरायांचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात

शिवरायांचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात


अहमदनगर : छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम विधानसभा लढत आहे.  छिंदम मायावतींच्या बहुजन समाज पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी घेतली. छिंदम अहमदनगर शहरातून मैदानात उतरल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड अशी लढत बघायला मिळेल. छिंदमची भाजपातू हकालपट्टी झाल्यानंतर तो महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडूण आला होता. गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदमला उपमहापौर करण्यात आलं होतं. मात्र शिवरायांविषयी बरळल्यानंतर त्याच्याविरोधात सर्वसामान्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments