Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरसाईबाबांचे मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले राहणार

साईबाबांचे मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले राहणार

Shirdi Sai Baba Templeअहमदनगर : दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.  नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ३१ डिसेंबरला दर्शनासाठी श्री साई मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.

मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार असल्यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती व १ जानेवारीची पहाटेची काकड आरती होणार नाही. श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यासर्व भाविकांना साईंच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ मिळावा, व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्‍य रितीने व्‍हावे, या उद्देशाने मंगळवारी ३१ डिसेंबर साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

नाताळ व नवर्षाच्‍या सुट्टीच्‍या गर्दीमुळे २५ डिसेंबर, ३१ डिसेंबर व १ जानेवारी, असे तीन दिवस श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहणार आहे. तसेच ३१ डिसेंबर व १ जानेवारी असे दोन दिवस वाहन पूजा बंद राहतील, याची साईभक्‍तांनी नोंद घ्‍यावी. मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्‍यास मनाई करण्‍यात आली असून सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने शिस्‍तीचे पालन करण्‍याचे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments