Friday, March 29, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरयशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर  l यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने अहमदनगरला येत होत्या. यावेळी हायवेवर शिरुरजवळ दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली आणि वाद झाला. यादरम्यान दुचाकीवर स्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला.

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलीस सध्या दुचाकीस्वाकाचा शोध घेत आहेत. यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तपासासाठी पोलीस हायवेवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहत आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments