Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रजळगावमी राष्ट्रवादीची ऑफर नाकारली; खडसेंचा गौप्यस्फोट!

मी राष्ट्रवादीची ऑफर नाकारली; खडसेंचा गौप्यस्फोट!

eknath-khadse,Assembly Elections 2019जळगाव: भाजपने एकनाथ खडसेंचा पत्ता कापल्यावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यावर खडसेंनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र, आधी राष्ट्रवादीचे नेते संपर्कात नसल्याचा दावा करणारे खडसे यांच्या या दाव्यात कितपत सत्य आहे. याचीच चर्चा सुरु आहे.

एकनाथ खडसे आमच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. त्यानंतर ख़डसे यांनी सांगितले होते मी कोणत्याही पवारांशी संपर्कात नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भेटल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. याबाबत खडसेंनी इन्कार केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा दावा खडसेंनी केला आहे.

खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. गेली तीन वर्षे कोणत्याही पवारांना भेटलेलो नाही, असे माध्यमांसमोर खडसे यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क करून मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती असे आता खडसे बोलत आहे. भुसावळमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे खडसे यांच्या विधानावर कितपत विश्वास करायचा अशीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments