Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्ररोहिणी खडसेंविरोधात शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर देणार टक्कर

रोहिणी खडसेंविरोधात शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर देणार टक्कर

जळगाव : एकनाथ खडसेंच्या बालेकिल्य्यात त्यांना संपवण्यासाठी खडसेची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देऊन टाकली. आता खडसेंच्या कन्येविरुध्द शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेना,राष्ट्रवादीची खेळी चांगलीच रंगणार आहे.

राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीने अपक्ष अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आपला पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. त्यामुळे एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या चंद्रकांत पाटलांनी आता राष्ट्रवादीच्या जोरावर रोहिणी खडसेंविरोधात दंड थोपटल्याचं चित्र आहे.

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला.  राष्ट्रवादीचे  उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केल्याने आता खरी रंगत भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रंगणार असल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments