Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रजळगावबापरे :‘हे उमेदवार म्हणाले, निवडून आलो नाही तर, वडिलांचं नाव लावणार नाही

बापरे :‘हे उमेदवार म्हणाले, निवडून आलो नाही तर, वडिलांचं नाव लावणार नाही

Satish Patilजळगाव : राष्ट्रवादीला गळती लागलेली असताना त्यांच्या पक्षाने जे विधान केले ते ऐकून सर्वजण अवाक झाले. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील पारोळा-एरंडोल मतदारसंघातून उमेदवार आहेत.यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आलो नाही, तर वडिलांचं नाव लावणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली. यामुळे डॉ. पाटील यांचा आत्मविश्वास बघून विरोधकांनाही धडकी भरली असेल.

डॉ. सतीश पाटील जळगावमधील पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे एकमेन आमदार आहेत. या भागात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत डॉ. सतीश पाटील यांनी विजय मिळवला होता. पारोळा एरंडोल हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे सतीश पाटील यांची लढत शिवसनेच्या उमेदवारांसोबत होईल. पारोळ्यात भाजपची देखील ताकद आहे. पारोळ्याचं नगराध्यक्ष पद भाजपकडे आहे. एरंडोल येथेही भाजप कार्यकर्ते सक्रिय आहेत.

माजी खासदार ए. टी. पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने ते सध्या शिवसेना-भाजपच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. आता विधानसभा निवडणुकीत एरंडोलमध्ये ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मागील निवडणुकीत देखील मोदी लाट असताना मी निवडून आलो होतो. त्यावेळी येथील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. तो यावेळी पाहायला मिळेल, असं मत सतीश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

डॉ. सतीश पाटील यांना विरोधकांचीही साथ असल्यामुळे त्यांनी वरील विधान त्याच आत्मविश्वासाने केले आहे. अशीही चर्चा मतदारसंघात रंगली आहे. त्यामुळे येथील रंगत चांगलीच होणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments