Friday, March 29, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकखडसेंच्या मुलीला भाजपने पाडले : छगन भुजबळ

खडसेंच्या मुलीला भाजपने पाडले : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
नाशिक: विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंचा पत्ता कट करुन त्यांची मुलगी रोहिणी खडसेला तिकीट दिलं. परंतु रोहिणी खडसेंना पाडणं ही भाजपाची चाणक्यनीती आहे. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला.

नाशिकमध्ये भुजबळांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, स्वबळावर सत्तेत येणार हा भाजपचा दावा खोटा ठरला. शिवसेनेलाही फटका बसलाय. विरोधी पक्ष म्हणून सरकारवर अंकुश ठेवणार. वाट्टेल ते करू ही सरकारची मानसिकता चालू देणार नाही, असं भुजबळांनी ठणकावलं.

गेले काही दिवस मला सरकारी पाहुणचार घ्यावा लागला, त्यामुळे नाशिकपासून काही काळ दूर राहव लागलं. आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीचा गड कायम राखायचा आहे. जे झालं गेलं ते विसरून जायचं, असा सल्ला छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मधली अडीच वर्ष आम्हाला सरकारी पाहुणचार घ्यावा लागला म्हणून मी नाशिकपासून दूर होतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड निसटली होती. विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देण्याचा आदर्श पवारसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रा समोर ठेवला. अनेक ठिकाणी उमेदवार देखील नव्हते. पवार साहेबांचा आदर पाहून जनतेने त्यांना साथ दिली. सेना भाजपविरोधात जे कोणी लढू शकत नाही त्यांना कार्यकर्त्यांनी आणि जनतेने साथ दिली, असं भुजबळ म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments