Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकनाशिकमध्ये भाजप-शिवसेना युतीत फाटाफूट; ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

नाशिकमध्ये भाजप-शिवसेना युतीत फाटाफूट; ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

vilas shinde nashik
नाशिक : मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शिवसेना भाजपात फाटाफूट झाली. नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे शिवसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचं सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युतीला झटका बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments