Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकलहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

लहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

sharad pawar on cm devendra ncp bjp
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पहिलवानाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. कुस्ती कुणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

पवार आज पिंपळगाव बसवंत येथे महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. सभेतील गर्दी बघून निफाडची जागा यावेळी महाआघाडीचा उमेदवार नक्की जिंकेल, असंही त्यांनी नमूद केलं. पुढे पवार म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले आमचा पहिलवान तेल लावून तयार आहे. मात्र, कुस्ती खेळतांना कुणासोबत कुस्ती खेळायची हे ठरवायचं असतं. लहानपणी जत्रेत कुस्ती खेळायचो. तेव्हा पैशांऐवजी रेवड्या द्यायचे. त्यामुळे लहान मुलांबरोबर कुस्ती खेळावी का हे ठरवावे लागते.” मी राज्याच्या सगळ्या कुस्ती संघांचा अध्यक्ष आहे आणि क्रिकेटचाही जगाचा अध्यक्ष राहिलो आहे, असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments