Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्रसोमवारी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!

सोमवारी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!

Uddhav Thackeray,Jayant Patil,Balasaheb Thorat, maharashtra vikas aghadi, ministry, maharashtra, mva, cabinet ministryनाशिक : महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेर सोमवारी ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षात मतभेद नाहीत, असं भुजबळ यांनी सांगितलं. ३० तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटपही त्याच दिवशी होईल, असं भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्री फक्त मंत्रिमंडळात आहेत. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे दोन असे सहा मंत्री आहेत. भुजबळांकडे ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन ही खाती आहेत. मात्र या सर्व खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments