Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकभाजपचे दोन बडे नेते शिवसेनेने फोडले, आज उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेने फोडले, आज उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

नाशिक : भाजपला महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार  बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

या दोन्ही नेत्यांनी काल गुरुवारी (7 जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं. आज शुक्रवार (8 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होईल. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर या निवासस्थानी हा प्रवेशसोहळा होणार आहे.

नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने राजकीय दावपेच टाकत आहेत. शिवसेनेनेही रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्यासोबत शिवसेनेचे काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

संजय राऊत यांनी भाजपचे दोन नेते फोडले

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पंचवटी परिसरात राहतात. पंचवटी परिसरात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला असल्याचे सांगितले जात होते.

हीच पोकळी भरुन काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा नाशिकचा दौरा केला. पंचवटी परिसरातून तब्बल 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे.

सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने ही फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments