Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र‘ईदची नमाज घरात राहून अदा करा’ राष्ट्रवादीच्या संदीप बेडसे ह्यांची मुस्लिम बांधवानकडे...

‘ईदची नमाज घरात राहून अदा करा’ राष्ट्रवादीच्या संदीप बेडसे ह्यांची मुस्लिम बांधवानकडे मागणी

संदीप बेडसे, Sandeep Bedse, Rashtrawadi, NCP, Eid, Namaz, Eid Namaz

शिंदखेडा-रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील मुफ्ती, आलीम, हाफीज, मौलवी, धर्मगुरु, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व व्यापा-यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला सोशल डिस्टंसिंग व फिजीकल डिस्टंसिंगचे योग्य नियोजन करून ईदची प्रार्थना घरातच पठण करावी असे विनंतीवजा आवाहनही केले.

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी प्रार्थनेकरिता ईदगाहवर न जाता तसेच सामुहिक व घराच्या छतावर प्रार्थना न करता घरातच पठण करावे. सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम संघटीत होऊन करणे टाळावे. संचारबंदी असल्याने ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी इतर नातेवाईकांच्या घरी जाणे अथवा आपल्या घरी येणा-या नातेवाईकांच्या भेटी शक्यतो कटाक्षाने टाळाव्यात. संचारबंदी शिथीलीकरणाच्या काळात सामान खरेदी करताना फिजिकल डिस्टंसिंग पाळणे, घरातील एकाच व्यक्तिने सामान खरेदीकरिता जावे, मास्क वापरावे व हात स्वच्छ करण्यासाठी साबणाचा किंवा सॅनिटायझर्सचा नियमीत वापर करणे, गर्दीची ठिकाणी टाळावी असेही आवाहन केले.

त्याचप्रमाणे यंदा पोलीस प्रशासनाला शांतता कमिटीची बैठक घेणे शक्य नाही. बेडसे हे स्वतः जबाबदारीने मुस्लिम बांधवांशी संपर्कात असतात. तालुक्यातील सर्वच समाजबांधवांनी काळजी घेणं आवश्यक आहेच ,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी आजवर प्रशासनाला सहकार्य केले आहे. गरजु व्यक्तींसाठी संदीप बेडसें चा ८०८०८०३२१० हा नंबर चोवीस तास कार्यरत असतोच तरी देखील पुढील काही दिवस काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. परिवाराच्या जबाबदारी सह इतरांची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे त्या अनुषंगाने सरकारने दिलेले आदेश पाळणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments