Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या अभियंत्यांना दोषी ठरवून पदाधिकाऱ्यांना अभय?

मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या अभियंत्यांना दोषी ठरवून पदाधिकाऱ्यांना अभय?

मुंबई : मुंबईतील ३४ रस्त्यांचा पालिकेचा चौकशी अहवाल आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला. यामध्ये १०० पैकी ९६ अभियंते दोषी आढळले असून केवळ अभियंते निर्दोष असल्याच दाखवण्यात आल. परंतु जेवढे अधिकारी दोषी तेवढेच पदाधिकारी सुध्दा दोषी आहे. मात्र अभियंत्यांवर खापर फोडून पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचारातून वाचवण्याचा हा प्रकार आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

मुंबईसह परिसरातील २३४ रस्त्यांपैकी ३४ रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी १०० अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. १०० पैकी फक्त चारच अभियंते निर्दोष आढळले आहेत, तर तब्बल ९६ अभियंत्यांनी मुंबईच्या रत्यांना खड्ड्यात घातल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील उर्वरित २०० रस्त्यांच्या कामातील त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्याच कामही प्रगतीपथावर असून त्याचाही अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणात एक चैन असून हे काम फक्त अभियंते स्वत:च्या निर्णयाने नव्हे तर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार करतात. टक्केवारीचा गणित ठरल्यामुळे सर्व भ्रष्टाचार राजरोसपणे चालतो. अशीही जोरदार चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments