अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सोमवारी सांगली बंदचे आवाहन

- Advertisement -

महत्वाचे…
1.दोषी पोलिस अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न २. पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करुन केली हत्या ३.सर्व दोषींवर कारवाईची मागणी


सांगली: सांगली पोलिसांकडू तुरुंगात अनिकेत कोथळे ची हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयास्पद भूमिका घेणाऱ्या उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करावे आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करावी, या मागणीसाठी सोमवारी सांगली बंदचे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीने केले आहे.

- Advertisement -

अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी आणखी सात पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
निलंबित ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, पोलीस कोठडीचे गार्डप्रमुख प्रदीप रामचंद्र जाधव, श्रीकांत सुरेश बुलबुले, ज्योती चंद्रकांत वाजे, स्वरूपा संतोष पाटील, वायरलेस ऑपरेटर सुभद्रा विठ्ठल साबळे व गजानन जगन्नाथ व्हावळ यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत. कोठडीतील मृत्यूनंतर प्रकरण दडपण्याचा झालेला प्रकार धक्कादायक असल्याचे सांगत तक्रारी असूनही फौजदार युवराज कामटेवर कारवाई का टाळण्यात आली, याची चौकशी करण्यात येत असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर महासंचालक बिपीन बिहारी यांनी सांगितले. अनिकेत कोथळे मृत्युप्रकरणी आतापर्यंत १२ पोलिसांवर कारवाई केली आहे. गरज पडल्यास सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही भूमिका तपासली जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री  दीपक केसरकर यांनी दिले.

- Advertisement -