भिवंडीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू, १७ जण अडकल्याची भीती

- Advertisement -

महत्वाचे…
१. बचाव कार्यासाठी इतरच्या घरांमुळे अडचणीचे २. भिवंडीत इमारत कोसळण्याची मालिका सुरुच ३. परिसरातील नागरिकांचाही बचाव कार्यासाठी पुढाकार


भिवंडी (मुंबई) : भिवंडीच्या नवी वस्ती भागातील चार मजली इमारत कोसळली आहे. वर्षे जुनी इमारत असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या आसपास इतर घरे असल्यामुळे बचावकार्यासाठी अडचणीचे जात आहे.  

या दुर्घटनेत ताहिर बिजनौरी नामक मुलीचा मृत्यू झाला आहे. ५ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे, तर ढिगाऱ्याखाली आजून १७ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात गाडी जाण्यासाठीही नीट रस्ता नसल्याने बचावकार्यात या सर्व गोष्टींचा अडथळा निर्माण होत आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफची दोन पथकं घटनास्थळाकडे रवाना झाली असून, एनडीआरएफच्या पथकाला लवकरात लवकर पोहोचता यावं, यासाठी ग्रीन कॉरिडोअर तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -