Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसहा वर्षात महिलांवरील अत्याचाराचे एक लाख गुन्हे!

सहा वर्षात महिलांवरील अत्याचाराचे एक लाख गुन्हे!

Gang rape of a minor girl in Solapurमुंबई : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना सुरु असताना महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात २०१४ ते २०१९ पर्यंत १ लाख ७ हजार ४४८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सर्वात जास्त विनयभंगाचे ७३ हजार ३१, तर बलात्काराचे २६ हजार ५१२ गुन्हे दाखल आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कधी थांबतील असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

हिंगणघाट आणि औरंगाबादच्या घटनेवरून विकृतीचा प्रकार समोर आला. अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्याच्यावर चर्चा होते. मोर्चे निघतात. मात्र, गुन्ह्यांची मालिका काही थांबत नाही. अत्याचाराच्या घटनांमध्ये बहुतांश घटना एकतर्फी प्रेम व लैंगिक वासनेतून घडल्याचे तपासातून समोर आले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत नेहमची प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात. राज्यकर्ते आणि पोलीस महिलांच्या सुरक्षेबाबत सजग असल्याची ग्वाही देतात, परंतु दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रकार वाढत चालले आहेत. हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.

२०१४ ते २०१९ पर्यंत महिलांसंबंधी गुन्हे….

  • २०१४ – १५२९३
  • २०१५ – १७२४४
  • २०१६ – १६७५७
  • २०१७ – १७६९२
  • २०१८ – २०२१३
  • २०१९ – २०२४९

एकूण –१,०७,४४८

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments