‘ऑनलाईन’,बदलीने गुरुजी हैराण!

- Advertisement -

पुणे – जिल्हापरिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी राज्य शासनाने यंदा ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने डाऊन होत असल्याने शिक्षकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे

शिक्षकांनी संगणकीय पद्धतीने अर्ज केल्यानंतरच त्यांचा बदलीसाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही शिक्षकांना ऑनलाईन बदली अर्ज भरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. दरम्यान, ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या तक्रारी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग- २४ ऑक्टोबर, पुणे विभाग-२५ ऑक्टोबर, नाशिक-२५ ऑक्टोबर, अमरावती-२६ ऑक्टोबर, नागपूर-२६ ऑक्टोबर, कोकण-२८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -