Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रपंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल, भुजबळ सेनेत जाणार?

पंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल, भुजबळ सेनेत जाणार?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहेत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जर छगन भुजबळ हे आज शिवसेनेत राहिले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, छगन भुजबळ हे राजकीय विरोधक आहेत, पण आमचं त्यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्व नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ हे मातोश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. छगन भुजबळ यांच्या सुटकेनंतर पहिल्यांदाच भुजबळ परिवारातील व्यक्ती मातोश्रीवर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments