Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआमच्या आमदारांना उदयन राजेंचा फोटो पाठवलाय: जितेंद्र आव्हाड

आमच्या आमदारांना उदयन राजेंचा फोटो पाठवलाय: जितेंद्र आव्हाड

jitendra awhad ncp
मुंबई : राज्यात ढगाळ वातावरण आहे. पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सत्तेच्या पेचप्रसंगावरून आमदारांच्या फोडाफोडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक टि्वट करुन आमचे आमदार फूटणार नाही. त्यांना उदयनराजेंचा फोटो पाठवून ठेवलेला आहे अशी फिरकी आव्हाडांनी घेतली.

शिवसेना, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर आमदार फोडण्याचा आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्या आमदारांना एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं आहे. तर काँग्रेसच्या आमदरांनाही जयपूर येथे पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. यासर्व घडामोडी लक्षात घेता आमदार आव्हाड यांनी टि्वटच्या माध्यमातून गरबड करणा-या आमदरांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

आव्हाडांनी हे टि्वट केले. त्याचीच जास्त चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments